STORYMIRROR

Venu Kurjekar

Abstract Others

3  

Venu Kurjekar

Abstract Others

आस

आस

1 min
152

सुकून गेली तारूण्याच्या,

श्रावणातील हिरवाई.

चैतन्याचे सूर ही विरले,

दिशा दिशा दाही. .......१


श्वासातील निशीगंधाचा,

उडून गेला गंध.

डोळ्यांतील दिव्यांचे,

तेजही झाले मंद. ........२


इंद्रधनू चे सप्तरंग ही,

होऊ लागले फिके.

जरठपणाचे भोवताली,

दाटू लागले धूके. ......३


समीप आता दिसतो आहे,

पानगळीचा ऋतू .

गळून जाऊ दे लोभ, लालसा,

लागो माणूसपण ते रूजू . ......४


वैशाखातील काहीलीची,

भासू लागली आच .

रणरण प्रभू ही सह्य होऊ दे,

तुझ्या सावलीची आस .



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract