काळीज ....!
काळीज ....!
काळीज चिरेबंदी वाड्यासारखं ,
जणू एखाद्या किल्ल्याच्या तटबंदीसारखं ,
तटस्थ .... निरंतर .
हत्त्यासारख्या दुःखानी टक्कर द्या ,
किंवा
लाकडासारख्या भक्कम संकटाच्या
ओंडक्यांनी ....
तटस्थ उभे असते
वारांना झेलत
कुठलाच प्रतिकार न करता
निमूटपणे .
मात्र अविश्वासाच्या घातकी तोफेच्या
बारुदाने काळीज छिन्नभिन्न होऊन जातं
मग कुठलीच चिरेबंदी , तटबंदी
नाही सावरू शकत ,
अन सगळंच संपून जातं
उरतं फक्त
छिन्नभिन्न काळीज ....!!!!