Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Prachi Deshpande

Abstract

4.5  

Prachi Deshpande

Abstract

मी

मी

1 min
1.3K


उत्तर सापडत नसलेला गूढ प्रश्न मी !

कदाचित काहींसाठी उत्तरच मी ?


विचारांत हरवली की लवकर न सापडणारी मी !

तर कधी स्वतःला नव्याने शोधून काढणारीही मीच !


विचारांचा कल्लोळ उठल्यावर त्यांना शांत करणारी मी !

आणि वेळ आल्यास , स्वतः च्याच तत्वांसाठी माझ्याच विचारांसोबत युद्ध छेडणारीही मीच !


माझ्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं धडपड करत शोधणारी मी !

मग, काही प्रश्नांना कायम अनुत्तरित ठेवण्याचा निर्णय घेणारी , ती कशी मीच?



Rate this content
Log in