Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prachi Deshpande

Others

5.0  

Prachi Deshpande

Others

मला करून तर पाहू दे !

मला करून तर पाहू दे !

1 min
452


मला माझेच पंख घेऊन उंच भरारी घेऊ दे !

तुम्हीच तर दिलं आहे पंखांना बळ ,

मग, मला करून तर पाहू दे !


कधी वाटते एखादी गोष्ट बरोबर, मला निवडून तर पाहू दे !

योग्य-अयोग्य मधील फरक समजवलात,

मग , मला करून तर पाहू दे !


वाटतं स्वतः च्या पायावर उभं राहावंसं, दोन पाऊलं तर पुढे टाकू दे !

लेकीने स्वावलंबी व्हावं अशी तुमचीच ईच्छा ,

मग , मला करून तर पाहू दे !


काही निर्णय स्वतः ला मनापासून घ्यावेसे वाटतात, थोडी मुभा दे !

स्वतः तल्या निर्णयक्षमतेची जाणीव तर तुम्हीच करून दिली,

मग, मला करून तर पाहू दे !


निवडलेल्या मार्गावर अखंड चालत राहावंसं वाटतं, थोड्यावेळ हात सोडून दे !

मार्गस्थ रहायला तुम्ही शिकवले,

मग, मला करून तर पाहू दे !


आयुष्याच्या वाटेवर होतील चुका असंख्य , पण मला चूक करू दे !

चुकांमधून धडे घ्यायला शिकवले तुम्ही मला,

मग, मला करून तर पाहू दे !


कधी वाट चुकली, कोसळली , एकटी पडली , तर तुम्ही आहात असा विश्वास मनी असतोच !

तोच विश्वास तुही ठेवून दे !

बघ, मी अशक्य ही शक्य करून दाखवेल !


Rate this content
Log in