STORYMIRROR

Prachi Deshpande

Others

4  

Prachi Deshpande

Others

ता(आ)ई

ता(आ)ई

1 min
159

कुशीत तुला घेता, अलगद तू निजते...

ताई च्या जवळ घेण्याने थोडी आईची ऊब येते...

आईच्या प्रेमाची किंमत अशाच लेकराला ठाऊक असते,

डोक्यावरन हळूच हात फिरवला तरीही ती भारावते..

तू गाढ झोपली तरी माझं विचारचक्र ते चालू असतं,

दाटलेल्या भावनांना अश्रूंचं माध्यम मिळालं असतं..

तुझा पापा घेत तुला खंभीर बनवायचे असे मनाशी ठरवत असते,

तेव्हाच ताईमधली आई तुझ्यासोबत कायम असण्याचं आश्वासन देत असते......


Rate this content
Log in