अश्रूंचा स्पर्श
अश्रूंचा स्पर्श
1 min
384
मनात भावना दाटून आल्या की डोळे भरून येतात,
पण अश्रूंना डोळ्यांच्या कडावरच थांबवून ठेवलं
तर काय मनावरचे घाव भरून निघतात ?
नयनांच्या कडा ओलांडून जेव्हा अश्रूंचा त्वचेला स्पर्श होतो,
तेव्हा तो स्पर्श सांगतो की चूक आपली की अजून कुणाची?
डबडबलेल्या डोळ्यांत विचारांचा गोंधळ चालू होतो!
एक लांब श्वास आपोआपच पाणावलेल्या डोळ्यासमोरची धूसर वाट बंद करतो !
मग डोळे उघडल्यावर स्वछ, नवीन मार्ग दाखवतो !
