STORYMIRROR

Prachi Deshpande

Abstract Inspirational

4  

Prachi Deshpande

Abstract Inspirational

कदाचित

कदाचित

1 min
5

काहीतरी मिळवण्याच्या नादात,

खूप काही गमावलं आहे ‛कदाचित’...


आठवणी किंमत मोजत आहेत त्यांची पुन्हा कमवता नाही येणार,

ते संचित ‛कदाचित’...


फार विश्वासाने चालणारी पावले अडखळत चालताहेत,

काळजावर दगड ठेवून, काही निर्णय उगाच घेतले ‛कदाचित’...


खूप साठलंय मनात, दाटुनही येतं डोळ्यात,

पण कुणाचा विचार करत, खोटं हसू ओठावर जपलंय ‛कदाचित’...


पाऊलखुणा सोडलेल्या खुणावत आहेत परतीची वाट...

पाऊलखुणा सोडलेल्या खुणावत आहेत परतीची वाट...

हाक मारून विळखा घातलाय आठवणींनी म्हणूनच हे शब्द जुळून आले ‛कदाचित’...


मान्य नाहीच अजूनही की गमावलं खूप काही...!!!

मान्य नाहीच अजूनही की गमावलं खूप काही...!!!

अनिश्चितता सांगतोय हा शब्द फक्त -‛कदाचित’

फक्त अनिश्चितता सांगतोय हा शब्द -‛कदाचित’!


पाणावलेल्या डोळ्यातही ध्येयाचीच आस आहे दृष्टीत...

ध्येयाचीच आस आहे दृष्टीत...

ध्येयाचीच आस आहे दृष्टीत...!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract