STORYMIRROR

Venu Kurjekar

Others Children

4  

Venu Kurjekar

Others Children

आठवडी बाजार

आठवडी बाजार

1 min
445

आज आहे बुधवार,

आठवडी बाजार. ....


बाजार जणू ओपन माॅल,

या बाजारात येते धमाल. .....


आजोबांचा धरून हात,

चालावे लागते जोरात. ....


गहू, तांदूळ,डाळी,साळी,

फिरत्या दुकानांच्या ओळीच ओळी. ....


फळे फळावळ अन् भाजीपाला,

केवढा गलका अन् केवढा कल्ला. ....


कमरेचे बेल्ट अन् चपला जोडे,

बाळाचेही झबले टोपडे. ....


नाना खेळणी अन् बाजा पिपाणी,

आईच्या बांगड्या अन् ताईच्या रिबीनी. ...


कित्ती दुकाने सांगू! होईल मोठी यादी,

गोडीशेव,गरम जिलेबी खाऊची दुकाने तरी किती......


आवडतो मज मनापासून हा बाजार,

साधे सरळ जगणे अन् साधा सोपा व्यवहार....


मुक्त मनाने, आनंदाने करावा संचार,

असा छान आमचा आठवडी बाजार. ....


Rate this content
Log in