श्रीहरी श्रावण
श्रीहरी श्रावण
आषाढ सरता लगबग श्रावणाची
रिमझिमत्या मनात,ज्योत तेवे मागंल्याची. ......
चराचरात चैतन्य,लेउनीया हिरवेपण,
घराघरात उल्हास, व्रत वैकल्ये अन् सण. .....
जाई जुईला बहर, दरवळे पारिजात
झेलू ऊन हळदे ओले ,बांधू झुला अंगणात.....
चढवून श्रावण साज, होते धरा पुलकित,
श्रावणाचे अन् तिचे एक आगळे गुपित .......
कवेत घेते वसुंधरा, त्या सावळ्या श्रावण सरी,
बावरते,सावरते जणू प्रियतमा ती लाजरी. ......
होते अवखळ, होते अल्लड जशी राधा बावरी,
अनेक विभ्रम दाऊन भुलवी खट्याळ श्रावण श्रीहरी. ......
