भुरुभुरु पाऊस
भुरुभुरु पाऊस
1 min
116
भुरुभुरू पावसात, तुरुतुरु चालू,
भुरुभुरु पाऊस अंगावर झेलू . ....
नको तो रेनकोट, नको छत्री,
आता करु पावसाशी खाशी मैत्री. ...,.
पावसाच्या सांगाव्या तऱ्हा तरी किती,
गडगडत ढग दाखवतात भीती. ....
कडकडत वीजबाई दाखवतात तोरा,
मागे कसा राहील बरे खोडसाळ वारा. ...
रिमझीमता पाऊस होतो धुवांधार,
रिपरिपता पाऊस,बरसतो मुसळधार. ...
असोत कितीही, पावसाच्या तर्हा
भुरुभुरू पाऊस, मला आवडतो खरा. ....
