शाळेला चला
शाळेला चला
सुट्ट्या संपल्या,
सुरू झाली शाळा.
पाठीवर दप्तर घेऊन,
शाळेला पळा. ......
नवी पुस्तके, नव्या वह्या,
लावू त्यांना कव्हर.
मोत्या सारख्या अक्षरात,
नाव लिहू त्यावर. ......
नव्याने आवरू,
छान छान कपाट.
नकोश्या पसाऱ्याला,
बाहेरची वाट. .......
पोळी भाजी चा डबा
आवडीने नेऊ.
पीझ्झा, बर्गर सटर फटर,
नको असला खाऊ. .....
वेळेवर गृहपाठ,
नियमित अभ्यास.
कशाला हवी ट्युशन,
अन् कशाला क्लास. ......
साऱ्या वस्तू ठेवू,
जागच्या जागी.
आईचा ओरडा,
खायचा नाही उगीच. .....
मोठ्यांचा आदर,
गुरुजनांचा मान.
नको भेदाभेद,
मित्र सारे समान. .....
होऊ विद्यार्थी गुणी,
होऊ शाळेची शान.
हसू,खेळू, नाचू,
शिस्तीचे ठेवू भान. .....
