जावून रानात
जावून रानात
1 min
178
व्हावे वाटे कधी रानफूल,
जावून रानात.
मैत्री करावी वाऱ्यासंगे,
त्याचे ऐकून गूढ गीत........१
व्हावे वाटे कधी मोर तो,
जावून रानात.
फूलवून पिसारा सुंदर अपूला,
नाचावे नादात........२
व्हावे वाटे कधी कोकीळ,
जावून रानात.
वैभव बघूनी वनराजीचे,
गीत गावे सुरात..........३
हे व्हावे ते व्हावे वाटे,
सदा मनात.
कधी न होऊ शकणार याची,
मनास फार खंत..........४
होऊ न शकलो कधी रानफूल,
आणिक काही,
होईन देशाचा,
नागरिक नेक..........५
परिसर ठेवीन,
स्वच्छ अपूला.
झाडे लावीन,
दाट अनेक.........६
