वाट पावसाची
वाट पावसाची
पावसा पावसा किती पाहावी रे वाट,
तापलेल्या धरणीचे तृषार्त रे ओठ. .....
आषाढ सरींची लागे मनी हुरहूर,
थुई थुई नाचासाठी आतुरला रे मोर. ....
नद्या, विहिरी,ओढे,तळी वटारून डोळे,
झाडझाडोरा उदास,सुकले रे शेतमळे. .....
सैरभैर काऊ चिऊ, नाही गुरांना रे चारा
बळीराजा संकटात करण्या पेरणी दुबारा. ...
नको घेऊ आढेवेढे बरस असा धुवांधार,
रानं वनं फुलू दे डुलू दे हिरवं शिवार. ..,.
