आठवणीतले क्षण
आठवणीतले क्षण
आता आठवणी बनत नाहीत तशा
ज्या सुखावून जातात मनाला
जुन्या आठवणीत जगावं लागतंय
कुठं शोधावं आता त्या क्षणाला.
माणूस माणसाला मुकला
आता हिच आठवण राहिलं का
त्याने मदत केली नाही
हेच कायम मनात राहिलं का.
एकदा फूल म्हणाले पाकळीला
तू आता गळून जा
जर राहिली नाही एक ही पाकळी
तर त्याकडे फूल म्हणून कोणी पाहिल का.
जर आठवणी च नाही राहिल्या
तर डोळ्यातून पाणी वाहिल का
विसरून जर गेलो आपण
तर त्या जगण्याला अर्थ राहिल का.
कधी हसवतात कधी रडवतात
अशाच असतात आठवणी
हसवलं जरी,आणि रडवल तरी
तरी येते डोळ्यात पाणी.
मलाही आठवलं म्हणून
सहजच आज मी लिहिलं
आणि वाचून या आठवणी
तुमच्या ही डोळ्यात पाणी आलं.
