पावसा, असा रे तू कसा?
पावसा, असा रे तू कसा?
काय रे पावसा ,
येतो तू असा,जसा
पाण्याचा नि तुझा
संबंधच नाही फारसा.
कुठे पडतो मुसळधार
कुठे संथ अशी धार
आभाळ दाटले जरी
वाऱ्यासोबत होतो फरार.
झाडा- झुडपांना फुलवतो
अंकुराची कळी खुलवतो
थांबत नाही कधी कधी
त्यांनाच तू उन्मळून पाडतो.
तुझी तरी काय चूक
तूच तर निसर्गाचा आरसा
कृत्रिम सौंदर्याने,
निसर्गालाच घातलाय वळसा.
