STORYMIRROR

Mayuri Udage

Inspirational Others

3  

Mayuri Udage

Inspirational Others

गंध शब्दांचे

गंध शब्दांचे

1 min
172

गंध हा फुलांचा

की सुवास जीवनाचा

ओंजळीत घेऊनी

उधळू या रंग आशांचा


हरवताना रंग जीवनाचे

पसरवूनी गंध शब्दांचे

पारिजात बहरूनी यावा

जरी न मिळे भाव आनंदाचे


रंग ज्यांचे नाहीसे झाले

गंध पसरवूनी जरा शब्दांचे

मदतीचा हात देऊया

जरी न येथे कुणी कुणाचे


नात्यांच्या या बंधात गूंतूनी

उसवत आहेत धागे मनाचे

हळूवार जोडू या त्यास आता

मिलन होता शब्दगंधाचे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational