STORYMIRROR

Mayuri Udage

Abstract Inspirational Others

3  

Mayuri Udage

Abstract Inspirational Others

पण ते आरशात का दिसत नाही?

पण ते आरशात का दिसत नाही?

1 min
268

आरशात दिसतो चेहरा,

दिसतो रंग सावळा की गोरा.

पण मग त्या अंतर सौंदर्यच काय

ते आरशातून का दिसत नाही?


खुलत नाही ते कधी सजावटीने,

फुलत जातं ते चांगल्या विचाराने

नसतं त्याला कुठलंही कृत्रिम सौंदर्य,

असतं त्याच ते प्रसन्न नैसर्गिक सौंदर्य.


दडवल त्याला कितीही कोपऱ्यात,

दिसत तरी एखाद्याच्या मनाच्या आरशात

असते गरज त्याला मनाचा आरसा स्वच्छ ठेवण्याची

नसते गरज त्याला कुठल्याही आरशाची.


चेहरा हा असतो मनाचा आरसा,

दिसतात त्यावर मनाचे भाव

ओसंडून वाहणार हेच सौंदर्य त्याच,

प्रतिबिंब त्या स्वच्छ आरशात.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract