ऋतुराज वसंत
ऋतुराज वसंत
कुणीकडून गोड गार वारा आला
वसंत पंचमीचा प्रारंभ झाला
कळून आले आपल्याला ही मग
वसंत ऋतूचा आरंभ झाला.
पिवळी पडली पाने
होऊनी पानगळ मग
हिरवी शाल पांघरण्यास
वृक्षही सज्ज झाला.
बहरती फळे-फुले
सुगंध दरवळला आसमंती
प्रसन्न अशा ऋतूराजाचे
स्वागत करण्यास निसर्गही सज्ज झाला.
निसर्ग बदलाचा नियम हा त्यानेही मान्य केला.
हिरवळीवर स्वार होऊन
ऋतूंचा हा राजा
फळा-फुलांसोबत बहरला.
