आखेरचा निरोप
आखेरचा निरोप
अशी माणसे सोडून जाती, क्षणात आहे क्षणात नाही.
आठवणी त्या कायम सोबत, बाकी मग काय उरते का काही.
छत्र हरवले हातही सुटले, पोरका आता झालो.
घरच्यांना खंबीर दाखवण्यासाठी, एकटाच कोपऱ्यात रडून आलो.
सगळं शांत वाटत आहे, तरी कल्लोळ भासतोय.
फक्त दाराकडे बघत, परतीचा रस्ता शोधतोय.
मलाही वाटतंय ओक्साभोक्शी रडावं, पुन्हा तुम्हांला कवेत घेऊन.
थोडासा त्रास द्यावा हसावं बोलावं, वेळ थोडासा मागून.
खुप काही राहिलंय, बोलायचं ऐकायचं आणी पाहायचय.
एवढ्या उपकारांच्या बदल्यात, थोडासा आनंद द्यायचय.
रुसलो तर आहे तुमच्यावर, का असा निरोप घेतलात.
मला सगळ्यात जास्त गरज असताना, मलाच सोडून गेलात.
