तू सवय बनलीस माझी!
तू सवय बनलीस माझी!
- नाही सुटणार ग तुझी सवय,
अवतीभवती जाणवत राहणार,
मला तुझ्या प्रेमाचे वलय...
- सवय तुझी नाही रे सुटत,
तुझ्या माझ्या प्रेमाची ही गाठ,
काही केल्या नाही रे तुटत..
तुला पाहण्याची ह्या डोळ्यांची,
सवय नाही ग सुटत...
- सवय काही सुटत नाही,
तू होतीस तेव्हा,
तुझी सवय झाली होती,
आता तू नाहीस तरीही,
तुझी सवय काही सुटत नाही..