STORYMIRROR

Geeta Mulik

Abstract

3  

Geeta Mulik

Abstract

मृदगंध पावसाचा

मृदगंध पावसाचा

1 min
197

वाट पाहे वर्षभर

राणी वरूण राजाची

विरहाने व्याकुळते

स्वप्ने बघते मृगाची......


येतो पहिला पाऊस

पाणी मोटेत घेऊन

आसमंताचे अंगण

घेते सुगंध पिऊन.....


मृदगंध पावसाचा

धरा मनसोक्त प्याली

शालू हिरवा पाचुंचा

नटून थटून ल्याली......


चिंब नाठाळ पाऊस

धरणीला बिलगतो

चाळे करून खट्याळ

तिला गंधित करतो......


मिठी मारतो पाऊस

मनोमनी शहारते

मुग्ध तल्लीन होऊन

रंगपंचमी खेळते.......


अंकुरते तिची काया

तृप्त होऊन लोळते

मऊ मखमली वर

मनसोक्त पहुडते......


आला झिम्माड पाऊस

नाचे सरीवर सरी

मनी हसत लाजत

धरा भरते घागरी.......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract