मांडणी
मांडणी
मोजताना हातून पडले
उचलताना गुलामीत वाकले
बोलताना गायब झाले
उघडताना बेनकाब झाले
सरकताना विस्कटत गेले
बसताना बिचकत मोडले
मांडताना तुडवीत आले
आवरताना संपवित सुटले
जिंकताना चोरून न्हेले
मिळवताना धरून बसले
संपताना उठून बसले
संपविताना कोंडून गेले
जुळणी भारी शब्दांची
मांडणी सारी रचनांची
