आवाज
आवाज
आवाज शांततेतला
कोलाहल माजवतो
काळ अंधारातला
कुतूहल वाढवतो
पांढरे जाळे
दूरवर पसरते
काळोखातले काळे
क्षणोक्षणी वाटते
अचानक अचंबित
येते समोर
मनास थांबवित
वाढते अंतर
खेळ काळोखाचा
कळतच नाही
जादुई आवाजाचा
गोंगाट राही
वाटले सगळे
संपले आता
धुरकट डोळे
वाकुनी बघता
सौ क्षितिजा कुलकर्णी

