मन
मन
मन एक समुद्र
त्यात आपण क्षुद्र
तरंगणारे विचार उटती
लाटांवर लाटा फेसळती
संथ गतीने वाहून
काहुर येते साठून
उसळते मधेच आपटते
विचार करून थकते
टोकावर थांबून बघितले
विचारांची खोलता मोजले
रुद्र रूप जलाचे
पेटून उठलेल्या मनाचे
अचानक भडकतो शांतपणे
खोल फिरलेल्या भोवऱ्यापणे
सौ क्षितिजा कुलकर्णी
