रंग पांढरा
रंग पांढरा
रंग पांढरा
असे एक
त्याची धारा
असे अनेक
जरी खुलला
सौम्य असा
त्यात फुलला
रंगांचा ठसा
सात रंगांचे
घेऊनी विचार
म्हणुनी पांढऱ्याचे
नाव तयार
रंगांचा अर्थ
एकच आहे
सोडा स्वार्थ
सांगत आहे
मोल नसे
ज्यास रंगांचे
चित्र दिसे
सैतानी वृत्तीचे
बेरंग झाले
त्यांचे आयुष्य
ज्यांनी नाकारले
सप्तरंगी इंद्रधनुष्य
सौ क्षितिजा कुलकर्णी
