मन
मन
मन अथांग सागर
त्यात वसले विश्व
भावनांची झाकली चादर
लागत नसे ठाव
लपंडाव अनेक असती
कधी येई समोर
सतत कसली धास्ती
फिरती मधीच नजर
तराजू सुख दुःखांचे
बाजूने टेहाळणी घालती
पळालेल्या हर क्षणांचे
तुटके काटके मोजती
उडून जाई वायुसह
शून्यात आस राहती
असा अनोखा तह
रोज नव्याने मांडती
मनाचे कित्येक कोपरे
क्षणक्षण फिरून येतात
बेसहारा भिंतीचे घरे
मोडकळून खाली पडतात
सौ क्षितिजा कुलकर्णी
