शिवार
शिवार
पेरले मातीत कण
उठले मनावर व्रण
राखुनी निगा दिवसा
घात केला पावसा
वाऱ्यासंगे डोलणारी पाती
उडत उडत जाती
शिवार पटकन भरलं
भरतच पाण्यात वाहिलं
दाण्या दाण्यातली रेलचेल
आता कशाने वेचेल
आशांचा झेलत आघात
मेळ विस्कटला नभात
पीक, पाणी मोती
क्षणात चक्काचूर होती
असली कसली भरणी
कोरड्या मायेची करणी
साठेना शिवार पापण्यात
पूर साठला आसवात
इडा पिडा बसली
माया ममता फसली