रेघ
रेघ
अथांग वाहते पाणी
त्यास पौर्णिमेची कहाणी
भरून सागर घेतो
उसळून लाटात परततो
किनारे निखारे वाटती
सागरास मधून उसळवती
जलाचे रौद्र रूप
अनोखे प्रतिबिंब कुरूप
सौम्य संथ वाहताना
मिश्किल लाटा उठताना
एकेक लाटा सुटती
काठ सागराचे मिटती
रेघ पुसती स्पष्ट
सागराचे चित्र अस्पष्ट
