पाते
पाते
वाईट स्वार्थी विचारांचे
कधी होणार दहन
आत दाटलेल्या अहंकाराचे
कसे होणार पतन
नुसत्या गर्दीची बोंबाबोंब
बघ्यांची मानसिकता घाण
खोट्या एकीचा आगडोंब
उगाचच फेकती आण
निखारे आगीचे उडती
गोल गोल फिरून
उसने अवसान पळती
पेटत्या धुरासह वरून
नुसतीच पाहून ज्वाला
हसू कसले येते
परतायचे ज्याला त्याला
क्षणभंगुर इथले पाते
सौ क्षितिजा कुलकर्णी
