रात्र पावसाळी (भयकविता)
रात्र पावसाळी (भयकविता)


होता मध्य रात्रीचा प्रहर पावसाने केला होता कहर .......
कामावरून मी उशिरा रात्री येत होतो घरी ......
मनात होते लवकर पोहोचावे माझ्या दारी ......
थोडे दूर गेल्यावर दिसली मला एक सुंदर ललना ......
विचार आला म्हणूं का हिला माझ्या घरी हि चल ना ......
तिला पाहून पावले माझी तिचा जवळ थबकली .....
मला पाहतच तिची कळी खुलली ......
तिला असे हसताना पाहून वाटले माझी पाहत होती ती वाट ......
मी म्हणालो काय करत इकडे पावसात जाऊ आपण एक साथ ......
निघालो आम्ही पोहोचलो असू थोडे दूर ......
पावसाचा जोर आता वाढला होता भरपूर ......
झालो होतो घायाळ पाहून तिचे सौन्दर्य ......
तिला घरी सोडून दाखवता येईल मला औदार्य ......
चालताना झाला तिला हलका स्पर्श ......
मोहरून गेलो मी झाला मला हर्ष ......
चालत चालत आलो आम्ही एका पुलावर ......
मी पहिले तर तिची नजर होती पाण्यात खोलवर .....
हि नदी किती छान वाहते .....
सर्वाना आपल्या मध्ये सामावून घेते ......
खळखळत होते पाणी वाढले होते पात्र ......
त्या नदीचे ते रुद्र रूप पाहून मी झालो गलितगात्र .....
अचानक झाले असे काही मारला तिने नदीत सूर .....
तिचे असे वागणे पाहून भीतीने भरून आला माझा उर ......
पुढे येऊन पाहू लागलो वाकून दिसते का कुठे .....
>
नजर दूरवर गेली खळखणाऱ्या पाण्याशिवाय काही नव्हते तिथे ......
तिने माझ्या समोर मारली होती पाण्यात उडी .......
तिचे हे कृत पाहून मला भीतीने भरली हुडहुडी ......
नजर जाताच मदती साठी आजूबाजूला .......
एका पोस्टर वर पडली नजर जे लोंबत होते वरच्या बाजूला ......
होता त्यावर त्या युवतीचा फोटो आणि काही मचकूर ......
तो वाचला आणि भयाने काळीज झाले माझे चूर चूर ......
त्या युवतीला मरून झाले होते दिवस आठ ......
ह्या पुलावरून उडी मारून तिने घातला होता आत्महत्येचा घाट ......
सर्व वाचून घाबरून सरकत होतो मागे ......
तसे कानात हलका आवाज आला पुढील सावज तुम्ही माझे .......
दिवस उजाडला थांबला होता पाऊस .....
पुलावर होते एक शव आणि पोलीस म्हणत होते ये हात नको लाउस .......
पोहोचलो नाही मी त्या रात्री घरी .......
कारण ते शव होते माझे जे पडले होते पुलावरी .......
हृदयविकाराचा झटका येऊन पडले हृद्य बंद .......
आता आम्ही दोघे शोधतो नवीन सावज लागला आम्हाला हाच छंद .......
येत का तुम्ही पण आमच्या सोबत त्या पुलावर होईल आपली भेट .......
त्यानंतर तुम्ही पण व्हाल मुक्त सर्वातून आणि सामील व्हाल आमच्यात थेट .....
पावसाळी रात्रीचा प्रवास करणे गोष्ट नाही चांगली ......
तुमच्या सोबत असे होऊ नये म्हणून माझी हि व्यथा मांडली ......