भीती आहे मनात
भीती आहे मनात


एक हाक मानवतेची ऐका हो जरा
धीराने परिस्थितीचा सामना करावा हो जरा
अघोरी या संकटाची भिती आहे मनात
पुरती ओळख नाही याची जनमानसात
कसे ठेवावे सावध स्वतःला कसे पाळावेत सारे नियम
जन्म जगण्यासाठी आहे मग पाळावेत हे कलम
ओढा लक्ष्मणरेषा भोवती थोपवा स्वतःला काही काळ
नका येऊ घराबाहेर नाहीतर सामोरा येईल कर्दनकाळ
सरतील हेही भितीचे दिवस
फेडू जल्लोषाने सारे नवस
होईल सुरळीत सारे सत्र
पुन्हा रंगवू या नवे चित्र