तो क्षण
तो क्षण


ज्याच्या आठवणीने होते मनाची बेचैन अवस्था
कसा विसरेन तो क्षण कुणी तरी अडवला रस्ता
रोज त्या जागेवर आलं मनात व्हायची हलचल
थोडा वेळ सुचत नव्हतं माझ्यासोबत काय घडलं
कुणी म्हणतं जागा खराब कुणी म्हणतं आहे भूत
ऐकलेल्या गोष्टी आहेत मिळालं नाही अजून सबूत
एके दिशी गावी जायला मला झाला थोडा उशीर
पॅडल जोरात मारीत होतो गाव गाठायाचे होते लवकर
खतरनाक जागा आली तेव्हा आपोआप माझे डोळे मिटले
रस्त्यावर समोर पाहतो तर काय भलेमोठे राक्षस आडवे झोपले
आता काय करावं काहीच कळेना
देवाच्या धाव्याशिवाय पर्याय दिसेना
तेवढ्यात मोठ्या गाडीच्या उजेडात
दिसले जे मला त्यावर विश्वास बसेना...
भूतबीत असे नव्हते काही
ते तर एक मोठे झाड होतं
रस्त्यावर उन्मळून पडलेले
नुकत्याच झालेल्या वादळात