स्मशान
स्मशान
झाली फारच वेळ आज
अजून कोणी का आला नाही
मनुष्य सारी संपली का
कूणी अजून का मेला नाही
रोज असतो गोंगाट नुसता
असतात पडले अवती भोवती
संपलेत का मरणारे सारे
एकही नाही आली अर्थि
वेळ अशी पूर्वी आली होती
दिवस रात्री असायचा रांगा
विचार करतोय झालंय काय
कोणास विचारु कुणीतरी सागां
विचलित होतोय सारखा
जळली कूठली भट्टीच नाही
निसर्गाचा नियमच आहे
मरणाला तर सुट्टीच नाही
सवय झालीय गर्दीची
एकांत मला नाही परवडणार
मरणार नाही कोणीच तर
अस्तित्व माझे कसे उरणार
जाळून जाळून जीर्ण झाल्या
शवा संगे माझ्या टीना
कोसळून कधी पडणार खाली
काहीच मी सांगू शकेना
दिसली मजला शव यात्रा
गर्दी आली पुन्हा छान
शव जाळूनी कर्म करीतो
असा आहे मी स्मशान