फुलपाखरू
फुलपाखरू
सुंदर सुंदर नाजूक नाजूक
रंगबिरंगी हे फुलपाखरू
भावतात हो सर्वांचा मनाला
प्रौढ असो वा असो लेकरू
सुंदर सुंदर रंग यांचे
पाणावलेल्या नयनांना सुख देतात
जीवन रंगीबेरंगी आहे
हे सर्वांना शिकवितात
निर्मळ कोमल स्पर्श यांचा
सर्वांच्या मनाला भारावतो
भान हरपूनी आम्हीजन सगळे
बालपण आपले आठवतो
लाल हिरवी काळी पांढरी
सप्तरंगी इंद्रधनू आकाशात
बघता त्या सुंदर छटांना
आनंद फुलतो मनामनात
