STORYMIRROR

Gajendra Kudmate

Abstract

3  

Gajendra Kudmate

Abstract

आहे तरी कोण

आहे तरी कोण

1 min
116

   आहे तरी कोण मी

   फक्त एक पुतळा जिवंत

   राहिली ओळख एवढ्याच पुरती

   वाटते सारखी मजला खंत


     मज स्वतःचे काहीच नाही

     दुसर्‍यांनीच मज आहे दिले

     अस्तित्व माझिये होतेच काय

     ठण ठण रिकामे पातीले


   जन्म दिला मज आईने

   बापाने दिले हो नाव

   कळतच नाही जाऊ कुठे

   न घर आहे न गाव


     सर्वथा स्वीकारतच गेलो

     दिले ज्याने जे हि काही

     परतफेड करायची कशाची

     मजकडे तर काहीच नाही


   हाडमांसाचा पुतळ्याला मजकड

   झाकण्यास नाही धड कापड

   झाली काया माझी खिळखिळी

   जैसे उडदमुंगाचे हो पापड


     आहे तरी मी कशासाठी

     आहे माझिया काय उपयोग

     काय पुनर्रजन्माचे निरंतर

     भोगतो आहे मी भोग


   जगतो तरी का बरं मी

   उपकारलेले हे आयुष्य

   आहे सर्वथा अवलंबून दुसर्‍यांवर

   निरर्थक असा मी मनुष्य


     मज वाटते आता लागेल मजला

     शोधावी माझिये ओळख

     ज्योत पेटवावी स्वाभिमानाची

     होण्याआधी जीवन काळोख



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract