52आठवडे लिखाण आव्हान स्पर्धेसा
52आठवडे लिखाण आव्हान स्पर्धेसा
1 min
403
मानवाने केली प्रगती
विज्ञानाची झाली निर्मिती,
विज्ञानाची धरून कास
मानवाने केला विकास.
विज्ञानाने दूर केले दु:ख
मानवी आयुष्यात आले सुख,
फोन, संगणक आणि दुरदर्शन
यांनी तर केले सुखी जीवन.
विज्ञानाने केली प्रगती
म्हणून झाली यंत्र निर्मिती,
यंत्रे झाली अनेक रुपी
अवघड कामे झाली सोपी.
चुटकी सरशी प्रश्न मिटतात
बसल्या जागी कामे होतात,
करून कमी डोक्याचा ताण
विज्ञान बनले आहे महान.
