उधळून काल माझा...........
उधळून काल माझा...........


उधळून काल माझा...........
उधळून काल माझा गेलीस डाव राणी
हळुवार तू फुलाने केलास घाव राणी
मिटवूनही मिटेना तो घाव अंतरीचा
कोरून काळजावर गेलीस नाव राणी
पोहायची कला मी शिकलो अजून नाही
आलीस तू किनारी बुडवून नाव राणी
बाजार भावनांचा नाही मला कळाला
केलास काळजाचा माझ्या लिलाव राणी
एका क्षणात हरलो प्रेमात सर्व काही
प्रीतीस जिंकण्याचा होता ठराव राणी
प्रेमात जीवनाची हरवून वाट गेलो
शोधू कुठे कुठे मी माझाच गाव राणी
जगण्यास भाव नाही आता मला कळाले
देऊन जा जरासा मरणास भाव राणी
*पंकज कुमार ठोंबरे वाशिम*