STORYMIRROR

Mohana Karkhanis

Abstract

3  

Mohana Karkhanis

Abstract

विध्वंसक

विध्वंसक

1 min
219

तेव्हा तुझ्या येण्याची चाहूल 

माझ्या पैजणांना लागायची सहजच …

रुणझुणत त्यांच्या मनीची गुपितं

माझ्यापर्यंत पोचायची सहजच…

जाईजुईलाही बहरायचे निमित्त  

क्षणोक्षणी तुझ्या आठवणींचा 

गजरा माळायला वेणीत सहजच …

शबदांनाही यायचा सुगंध 

फक्त तुझ्या ओठांच्या स्पर्शाने सहजच …

आता मात्र…. राहीलाय सुकलेल्या

जाईजुईचा निःश्वास अन् घरंगळलेल्या

पैंजणांचा आभासी आवाज कारण …

तुझ्या त्या विध्वंसक येण्याचा 

घेतलाय सर्वांनीच धसका …

कधीकाळी दरवळलेल्या अत्तराच्या फायाच्या शोधात 

आहेत सर्वजण … इथे तिथे सर्वत्र 


Rate this content
Log in

More marathi poem from Mohana Karkhanis

Similar marathi poem from Abstract