STORYMIRROR

Prakash Chavhan

Abstract

3  

Prakash Chavhan

Abstract

विठ्ठला पांडुरंगा तु

विठ्ठला पांडुरंगा तु

1 min
371

सावली तू देवा 

सगळ्या मनाची 

दे ठावं मतिला 

 शुद्ध अंतरीचे 


आधार तू विश्वासाचा 

मनी देतोस रे बळ 

मायेची ऊबदार माऊली 

असाह्यचा दिवा तू


विठ्ठला पांडुरंगा 

मन शांतीचा वसा तू 

आलो आज तुज भेटीला 

धन्य झालो धन्य देवा


 ह्र्द्यात सदा रूप तुझे 

पाहतो मी लोचनीं देवा 

भक्ती भावाचा ओढा हा 

असाच निरंतर वाहू दे


विठ्ठला पांडुरंगा तू..... 

लेंकूरवाळा मायबापा 

असू दे तुझे आशिर्वाद 

भोळ्या भाविक भक्तांवरी 


विठ्ठला पांडुरंगा तू... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract