STORYMIRROR

Venu Kurjekar

Abstract Others Children

4  

Venu Kurjekar

Abstract Others Children

माय मराठी

माय मराठी

1 min
12

माझी माय मराठी 

माझ्या माय मराठीला,
ज्ञानोबाचा आशीर्वाद......

नामा, तुकोबांच्या अभंगांत,
माय मराठी वाहत......

जना, मुक्ता बहिणाईच्या,
ओव्यांचा परिमळ.......

घराघरात पसरतो,
पसरतो रानोमाळ......

समर्थांची शिकवण,
मनाच्या श्लोकात.....

माय मराठी बोलते,
नाथांच्या भारूडात......

पोवाडे सांगती,
शूर वीरांचे गुणगान.....

लावण्यवती लावणीचा,
माय मराठीत सन्मान......

माय मराठी अभिजात,
तिचा अभिमान मनात......

करू तिचे संवर्धन,
भाषा ( स्वच्छ ) मराठी बोलून.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract