STORYMIRROR

Venu Kurjekar

Abstract

4  

Venu Kurjekar

Abstract

सावळे सावळे

सावळे सावळे

1 min
7

सावळे आभाळ, 
सावळा श्रीरंग.
यमुनेचा डोह 
सावळा, सावळा.....

डोगंर सावळे, 
दर्‍या त्या सावळ्या. 
दाट झाडी दिसे, 
सावळी, सावळी......

धरणी सावळी, 
सागर सावळा. 
पावसाच्या सरी, 
सावळ्या सावळ्या .......

सांज ती सावळी, 
पहाट सावळी.
प्रभातीचे धुके, 
सावळे सावळे......

सकळ व्यापिले, 
सावळ्या हरीने, 
अवघे चराचर, 
सावळे सावळे......










साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract