विठूस
विठूस
विठू मज वाटे,
वारी चा रे हेवा,
आनंदाचा ठेवा,
वारी संगे. .......
दिंड्या नी पालख्या,
येती तुझ्या दारी,
धन्य धन्य होई,
वारकरी. .......
वाटे मज फार,
वारी संगे यावे,
नतमस्तक व्हावे,
तुझ्या पायी. ......
आळस, चंगळ,
सोडी ना रे हात,
करूनीया मात,
भक्तीवरी. .......
संसार सागरी,
बुडालो रे आम्ही,
तार रे श्रीहरी,
मायबापा. .......
