पीळ पडे मनाला
पीळ पडे मनाला
जीवघेण्या चक्रीवादळाने
घेतले किती जीव निष्पाप
काय अपराध हो तयांचा?
आक्रोशांनी होई थरकाप
दरड कोसळूनी नांगर
फिरला हो घरादारांवरी
गाडले कितीक तयाखाली
बघवेना दूरदर्शनवरी
कोरोनाचे दुष्टचक्र आता
तिस-या लाटेवरी स्वार
अगणित हो मनुष्यहानी
मनुजा तू किती मोजणार?
कमी दाबाचे पट्टे आरुढ
आपल्या महासागरांवरी
महापूर ये अतीवर्षणे
गावे उध्वस्त लाटांवरी
प्राथिते ईश्वरा कर जुळवुनी
थांबव ही तगमग जीवघेणी
ईश्वरा का अशी अनिष्ट करणी
चुकले - माकले माफ कर मनी
