कधी कधी
कधी कधी
तुझ्या ह्या सोबतीने
जीवन बहरूनी निघाले
कधी वाटले आपलेसे
कधी एकत्रित दिसले !! धृ !!
पावसाच्या मंद गतीने
थेंब थेंब नवे वाटे
कधी आवडले मनाला
कधी तुझ्यात दाटे !! १ !!
फुलनाऱ्या ह्या कळीत
तुझा स्पर्श व्हावा
कधी वाटे हृदयाला
कधी आवडी डोळयांना !! २ !!
>
मनात येतच असे
तुला पाहतच बसावे
कधी वाटले मनाला
कधी स्वप्नात निजावे !! ३ !!
कोरडे अंधार व्हावे
कोरडे हे भास दिसावे
कधी थेंब पाण्याचे
कधी प्रतिबिंब भासावे !! ४ !!
सोबत घेऊनी तुला
हात हातात घ्यावा
कधी विचारी मनाला
कधी गुंतले हृदयाला !! ५ !!