प्राणरक्षक
प्राणरक्षक
संकटाचे सावट भोवती
एकत्र लढण्याची वृत्ती
उभा राही आपल्या रक्षती
तेथे कर माझे जुळती !! धृ !!
दिवसांवर दिवस जाती
कित्येकांचे प्राण रक्षती
जाणीवतेची ही महती
तेथे कर माझे जुळती !! १ !!
मन न कोणाचे दुखवती
रुग्णांची करतो तो स्तुती
प्राणरक्षक आपल्या भोवती
तेथे कर माझे जुळती !! २ !!
तुमच्या कार्याची महती
करतो तुमची स्तुती
आदर आमच्या मनी
तेथे कर माझे जुळती !! ३ !!
पाठिंबा आहे, बळही
सुखी तुमचे चेहरे दिसती
परमेश्वराचा हात पाठीशी
तेथे कर माझे जुळती !! ४ !!
देवास नाही पाहिले
तुमच्यात देव दिसती
प्राणदाते तुम्ही आमचे
तेथे कर माझे जुळती !! ५ !!
