Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Yashodhara Sonewane

Inspirational

3  

Yashodhara Sonewane

Inspirational

आजची स्त्री

आजची स्त्री

1 min
286


बंधन पारतंत्र्याच्या तोडून बेड्या

बंधनातून मी आज मुक्त झाले

मोकळ्या आभाळी घेईन भरारी

स्रीजन्माचे माझ्या सार्थक झाले । । 


युगानुयुगे जखडलेली

मी एक नारीशक्ती

सहनशक्तीची जोखंडे

प्रेम त्यागाची अंगी भक्ती । । 


बंदिस्त झालो आज जरी

सूर्य उद्याचा पाहीन पुन्हा

अजानताच घडतो ना

कधीतरी हातून गुन्हा ।।


आज तोडूनी शृंखला

बंधमुक्त मी जाहले

घेई गरुड भरारी

स्त्रीत्व तेजाने नाहले । । 


सर्व बंध तूच झुगारून

नारी तोड आता ती शृंखला

मुक्त होशील तू ग जीवनी

 राहशील ना उद्या अबला । । 


हो मुक्त तुझ्या जीवनी

घे आभाळ कवेत भरून,

तोडून टाक पाश सारे

खुणावती दिशा या दुरून.। । 


नारी घे तू उंच भरारी 

शृंखला तोडून स्वबळावर 

आत्मविश्वास चिकाटीने 

मात कर येणाऱ्या संकटावर.। । 


बंधनात अडकून

होती बिचारी

तोडून बंधन

झाले मी विचारी । । 


बंध बेडीचे तोडूया

होता उषःकाल आज

नव क्रांतीची मशाल

डोईवर शोभे ताज.। ।  


खोला माझ्या हातातील बेडी

होऊ द्या आज मजला मुक्त

बनवू द्या माझे स्वतंत्र अस्तित्व

होऊ द्या स्वयंसिद्धा नारी सशक्त । । 


तोड सारे बंध आता

स्वयंसिद्धा ती सबला

कर्तृत्वाचा वाजे डंका

नसे आता ती अबला । । 


अवनीवर जन्म घेता बाईचा

अडकले मी अनेक बंधनात

स्वैर होऊन मनसोक्त उडावे

सूर्यासम झळकावे गगनात । । 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational