STORYMIRROR

Yashodhara Sonewane

Tragedy

4  

Yashodhara Sonewane

Tragedy

वृद्धांना मिळावे घर हक्काचे

वृद्धांना मिळावे घर हक्काचे

1 min
175

माणूस म्हणून जगू द्यावे 

नका छळू म्हाताऱ्या जीवांना। 

दिवस येती सर्वांवर रे

जीवन-मरण लागले सजीवांना।१। 


लहानपणी सर्वच मुलांचे

राहतात आई-वडील सर्वस्व। 

मग का रे मोठे झाल्यावर 

मायबाप नकोशी वाटतात।२। 


अनवानी पायी माता-पित्याने

उभ्या आयुष्याचे ओझे वाहिले। 

ऐन तारूण्याच्या उमेदीत दोघांनी 

नाही सुखाची फळे चाखले।३। 


एकएक पैसा जमवून

घर शिवार उभे कराया। 

केले काबाडकष्ट जीवा

म्हातारपणीच काढता पाया।४। 


घर बांधाया रक्ताचे पाणी

केले आपल्या पाखरासाठी। 

म्हातारपणीच का मिळावे

राहण्यासाठी वृद्धाश्रम।५। 


स्वकष्टाने बांधलेले असते

त्यात हक्क प्रथम असावा। 

मिळावे घर वृद्धांना हक्काचे

नाही त्यांना पोरका वाटावा।६ । 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy