सुंदर सकाळ
सुंदर सकाळ




रवीकिरणे उगवले पृथ्वीवर
वातावरण सारे प्रसन्न होई
घंटानादाने जमले सारे
लोक मौन धारण करी । १।
असे काकड आरतीचा
गावात गजर सारा
प्रातविधी आटोपून सर्व
माता बालक येती सारे ।२ ।
मंदिरात नाद सर्व दरवडे
सकाळचे हे सारे परिसर
नतमस्तक होऊन चरणी
मोहक मनोरम्य वातावरण ।३ ।
जाऊन बळीराजा वनात
निसंर्गप्रेमी निघाले दर्शना
घेऊनी खावयाच्या साऱ्या
जिन्नस सौंदर्य पाहण्या ।४ ।
पावसाची कृपा झाली
यंदा मस्त पाऊस खास
फेडू कर्ज फेडण्या लगेच
होईल सारी पूर्ण हौस । ५।