कीर्तन
कीर्तन
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
भक्तीची ज्योत अशी
मनामनात सदैव तेवते,
किर्तनात जीवनाचे जणू
सत्त्व सामावलेले असते.
समाजप्रबोधन करी असे
अंतकरणाला हात घालून,
किर्तनाच्या संगतीत राही
असूरही देव बनून.....
नामाचा गजर गाजतो
मनोमनी भाव भक्तीचा,
ज्ञानबा तुकाराम गर्जतो
नाद एक दिव्यशक्तीचा..
मन आपसूक सात्त्विक
विचार परहिताचे स्मरती,
जीवनाचे वास्तव ,सत्य
संत -महात्मे सांगती.....
समाजास प्रवृत्त करूनी
प्रबोधनाचे एक माध्यम,
मनोरंजन गावोगावी
लोकजागृतीचे साधन....
🌷🌷🌷🙏🙏🌷🌷🌷
