STORYMIRROR

Anil Kulkarni

Inspirational

3  

Anil Kulkarni

Inspirational

बायको वर बोलू काही..

बायको वर बोलू काही..

1 min
212

बायकोचं असणं बायकोचं नसणं

माझं जगणं माझं मरणंअसतं

माझा श्वास माझं गुदमरणं असतं.

बायकोचं असणं पुनवेचा चंद्रअसतं.

नसणं अमावस्येची रात्र असतं.

असणं गालावरची खळीअसतं.

नसणं भयाण पोकळी असतं.

बायकोचं असणं मुदतीची ठेवं असतं.

बायकोचं नसणं ठेवीवरील व्याज असतं.

बायको असते जगावेगळी...

प्रत्येकाची असते आगळी वेगळी

बायको हवीशी, नकोशीचं मिश्रणअसते.

बायको म्हणजे जणु इंद्रधनुष्य आकाशी.

बायको म्हणजे पतीच्या अंगणात पडणारा पारिजातकाचा सडा.

बायको म्हणजे आयुष्यात 'मोगरा फुलला' असते.

बायको म्हणजे शब्दात सांगता येत नाही.

असं ते एक सुंदर नातं असतं.

बायको म्हणजे कुटुंबाला एकत्र ठेवणारं चुंबक असतं.

थोर आईला जन्म देणारी बायकोच असतें.

नाव मात्र आईचंच होतं.

कविता मात्र आईवरच होते.

बायको कुठे काय करते असे प्रश्न मला नाही पडत.

बायकोची भूमिका पडद्यामागची असते.

बायको म्हणजे आयुष्याचं नेपथ्य असतं.

बायको म्हणजे आपल्या आयुष्यातील प्रकाश योजना.

बायको म्हणजे आपल्या आयुष्याची दिग्दर्शक.

हात दाखवणाऱ्या जगांमध्ये बायको शेवटपर्यंत हात देते व साथ देते.

बायको नुसतं एक शरीर नसतं. 

बायको एक मन असतं.

बायको म्हणजेआपल्याच मनाचा हळवा कोपरा असतो.

काही गोष्टींची नोंद होत नाही पण त्या सुखावून जातात. बायकोच असंच आहे.

दवबिंदूची कुठे नोंद होते?

इंद्रधनुचे कुठे नोंद होते.

त्या त्या वेळेस ते सुखावतांतच.

 नात्यांच गुंफणं, नातं घट्ट करतं.

जिथे गुंफण आहे तिथे गुंतणं आहे.

सहवासात जेवढी गुंफण.

नात्यांचं तेवढं घट्ट कोंदण.

काही अर्थ शोधायचे नसतात जगायचे असतात.

काही गोष्टी बोलायच्या नसतात, अनुभवायच्या असतात. बायको त्यापैकीच एक. 

कोण कुठे काय करतोय हेच कळत नाही, अशा परिस्थितीत बायको मुळेच आपली ओळख असतें.

नटसम्राट व्हायला,रंगमंच जिंकायला पडद्यामागच्या शक्तीच कारणीभूत असतात, हे नाकारून चालणार नाही.

पुरुषाच्या यशापयशाचं परिमाण बायको असते.

बायको म्हणजे नुसती बोलण्याची गोष्ट नाही.

बायको साठवणीत व आठवणीत ठेवण्याची गोष्ट आहे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational